You are currently viewing जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम क्रमांकाचे मानकरी..

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम क्रमांकाचे मानकरी..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता सप्ताह २०२१ अंतर्गत आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर यांनी प्रथम क्रमांकासह नगराध्यक्ष चषक पटकावला. यात स्पर्धेत ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून श्रीकृष्ण आडेलकर, तर सहाय्यक परीक्षक म्हणून कौस्तुम पेडणेकर व कणकवलीचे उबटे सर यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी प्रदीप पभू यांचे मार्गदर्शन लाभले. १४ वर्षांखालील मुलगे- आयुष राठोड (प्रथम), मावेश कुडतरकर (द्वितीय), वैभव राऊळ (तृतीय), सौरभ चारगळकर (चतुर्थ), खुला पुरुष गट – बाळकृष्ण पेडणेकर (प्रथम), सुदिन पेडणेकर (द्वितीय), एन.जी. मणेरीकर (तृतीय), तेजराज रेमुळकर (चतुर्थ), डॉ. अमितकुमार सोंडगे (पाचवा) यांनी क्रमांक पटकाविले. सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, साक्षी पेडणेकर, शैलेश गावडे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, स्नेहल खोबेरकर, कृतिका कुबल, कृपा गिरप-मोंडकर, पूनम जाधव, दादा सोकटे, श्रेया मयेकर, यांनी अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..