You are currently viewing मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी गृप तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी देणगी..

मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी गृप तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी देणगी..

सावंतवाडी /-

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या विद्यमान मुख्याध्यापिका तसेच गावच्या सुपुत्रिका व माजी विद्यार्थीनी सौ.प्रमिला राणे/सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी एम ई. एस. एम. शाळेचा 1987-88 चॅम्पियन्स गृपच्या वतीने शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या गणवेशांसाठी जमा झालेली रक्कम धनादेश स्वरूपात सूपूर्द करण्यात आली. यावेळी शाळेचे विद्यमान शिक्षक/पर्यवेक्षक एम. बी.फाले,ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. कदम,लिपिक जी. एस. कानसे तसेच गृप मधील सदस्य /माजी विद्यार्थी तथा शिक्षक प्रशांत राऊळ,समीर परब, सुर्यकांत सांगेलकर , वर्गातील आदर्श व दानशूर माजी विद्यार्थी हरी वारंग तसेच गृप चे अॅडमिन तथा माजी विद्यार्थी सुखदेव राऊळ व गृप चे सक्रिय सभासद तथा माजी विद्यार्थी महेश शिरोडकर,रामचंद्र लोके, राघोबा राऊळ, शंकर म्हापणकर आदी उपस्थित होते.यावेळी गृपच्यावतीने सुर्यकांत सांगेलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत राऊळ व आभार प्रदर्शन समीर परब यांनी केले. सौ. राणे/सावंत मॅडम यांनी गृपच्या कार्याचे कौतूक करताना भविष्यातही गृप कडून अशीच भरीव कामगिरी व्हावी असा मनोदय व्यक्त करुन गृपच्या या कार्यामुळे आपण भारावून गेल्याची भावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा