You are currently viewing वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे हायवेच्या कारभारा विरोधात 23 रोजी आमरण उपोषण.

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे हायवेच्या कारभारा विरोधात 23 रोजी आमरण उपोषण.

कुडाळ /-

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात वेताळ-बांबर्डे गावातील समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांनी वेळ काढून भूमिका घेतल्याने जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासन व महामार्ग विभाग थातुरमातुर उत्तर देऊन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने वेताळ-बांबर्डे ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे.यामध्ये वेताळ-बांबर्डे सरपंचांनी ग्रामसभेच्या ठरावानुसार दिलेल्या मागणी पत्रात राष्ट्रीय महामार्ग बाधित तेलीवाडी नळपाणी योजनेचा प्रश्न निकाली काढणे,महामार्गापासून मुस्लिमवाडीकडे जाणारा जोडरस्ता सुस्थितीत करणे,राष्ट्रीय महामार्ग बाधित मुस्लिमवाडी कब्रस्‍तान पुनर्वसन प्रश्न निकाली काढून गैरसोय दूर करणे,वेताळ बांबर्डे तिठा दुतर्फा प्रवासी पिकअप शेड बांधणी करून प्रवासी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करणे,वेताळ बांबर्डे पूल ठिकाणी महामार्गाला जोडुन नानेभाटवाडी, वाघभाटलेवाडी कडे जाणारा जोडरस्ता सुस्थितीत करणे,वेताळ बांबर्डे पूल येथे पिकअप शेड उभारणे,राष्‍ट्रीय महामार्गास लागून तेलीवाडी ग्रामस्थांना सर्विस रोड सुविधा उपलब्ध करून गैरसोय दूर करणे,वेताळ बांबर्डे देऊळवाडी प्राथमिक शाळा परिसरात रस्‍त्‍याच्‍या बाजुने संरक्षण भिंत बांधणे, हायवे बाधित प्रकल्पग्रस्तांना मोबदला रक्कम तात्काळ अदा करणे, वेताळ बांबर्डे तेलीवाडी बस स्टॉप कडे पावसाळ्यात होणारे चिखलाचे साम्राज्य टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे या समस्यांची तात्काळ पूर्तता करण्याचे निवेदन रूपात प्रशासनाकडे सादर केले होते मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून थातूर माथूर उत्तरे देण्यात आल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

अभिप्राय द्या..