You are currently viewing कणकवलीतील मनोरुग्ण महिलेला संविता आश्रमचा मिळाला आधार..

कणकवलीतील मनोरुग्ण महिलेला संविता आश्रमचा मिळाला आधार..

कणकवली /-

शहरात गेले काही वर्ष एक मनोरुग्ण महिला फिरत होती. त्या महिलेची होणारी परवड पाहून कणकवलीतील संवेदशील नागरिकांनी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या परवागनीने त्या महिलेची परवड दूर करण्यासाठी पणदूर येथील संविता आश्रमाला कळविले. त्यानंतर संविता आश्रमच्या टीमने त्या महिलेला कणकवलीत येऊन नेत आधार दिला आहे. त्याबद्दल संविता आश्रमचे कौतुक केले जात आहे.

कणकवली बाजारपेठत गेले काही महिने एक मनोरुग्ण महिला फिरत होती. ही माहिती शहरातील काही नागरिकांना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी यांच्या सहकारी मंजिरी यांनी दिली. सदर बाब आश्रमाचे संदीप परब यांच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यानुसार लेखा मेस्त्री, उदय कामत, सुनील पालव, ज्योती आंगणे, मनाली पालव यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर परवागनीने तिला ताब्यात घेऊन एका वाहनात बसवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आश्रमाच्या स्वाधीन केले. त्यानंतर तिला पणदूर येथील संविता आश्रमच्या टीमने तिला आश्रमात नेले आहे. कणकवली शहरातील संवेदनशील नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परेतमुळे त्या मनोरुग्ण आणि निराधार महिलेला कायमस्वरुपी आश्रय दिला. त्या महिलेला आश्रमात आणल्याबद्दल जीवन आनंद संस्थेचे संदीप परब यांनी त्या नागरिकांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..