You are currently viewing शिवसेनेचे नेते राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवतात.;विशाल परब.

शिवसेनेचे नेते राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवतात.;विशाल परब.

येत्या काळात राणेंवरील टेकेल्या टीकेला जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;भाजपचे युवानेते विशाल परब यांचा शिवसेना नेत्यांना ईशारा..

कुडाळ /-

शिवसेनेचे नेते हे राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवत आहे येत्या काळात राणेंवरील टेकेला जश्यास तसे उत्तर दिले जाईल असा ईशारा आज भाजपचे युवानेते विशाल परब यांनी शिवसेना नेत्यांना दिला आहे.भाजपचे विशाल परब हे आज कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाले आहेत.ते म्हणाले की ,नारायण राणेंसह त्यांच्या कुटुंबियांवर टिका केल्यास शिवसेनेच्या पालकमंत्र्यासह खासदार,आमदार यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी ईशारा दिला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात आत्ता पर्यत झालेल्या खासदारांनी इतिहास घडवला. परंतू विनायक राऊत हे सपशेल अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे ते खासदार असल्या सारखे वाटतच नाहीत तसेच नारायण राणेंसह त्यांच्या कुटुंबियांवर टिका केल्यास शिवसेनेच्या पालकमंत्र्यासह खासदार,आमदार यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही.तसेच पालकमंत्र्यांच्या गाडीतून कोणाला उतरवून घातले.ते माहीत आहे.अशी टिका करत भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी दिला पत्रकार परिषदेतून शिवसेनेच्या नेत्यांना इशारा दिला आहे.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, श्री.राऊत यांनी राणेंवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावे. येणार्‍या काळात ताकद कोणाची जास्त हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देवू,तसेच राणेंवर टिका केल्यास तुमच्यासह पालकमंत्री आमदार यांना या जिल्हयात फीरू देणार नाही, असा इशारा सुध्दा त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे.श्री.परब यांनी आज कुडाळ येथील हाॅटेल लेमन मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंवर टिका करणार्‍या राऊतांसह,पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली. ते म्हणाले, शिवसेनेत राऊत यांची म्हणावी तशी किंम्मत राहीलेली नाही. त्यामुळे त्यांना लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे राणेंवर टिका करावी लागत आहे. मात्र काही झाले तरी येणार्‍या निवडणूकात आम्ही राऊत यांना त्यांची जागा दाखवून देवू, मोदींच्या लाटेवर निवडून आलेल्या विनायक राऊत यांनी हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी,तर शिवसेनेचा एक बडा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, असेही श्री.परब यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा