वेंगुर्ला /-
केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेहि पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करुन सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा. अन्यथा भारतीय जनता पक्षाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा वेंगुर्ले तालुका भाजपा तर्फे येथील तहसिलदार यांना लेखी निवेदन सादर करुन देण्यात आला.
भाजपा जिल्हा सरचिटणिस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुका सरचिटणिस बाबली वायंगणकर, कार्यालयीन सचिव शरदजी चव्हाण, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष दादा केळुस्कर, परबवाडा सरपंच विष्णू परब, अँड. सुषमा प्रभूखानोलकर, नामदेव धर्णे, नगरसेविका साक्षी पेडणेकर, महिला तालुकाअध्यक्षा स्मिता दामले, सरचिटणिस वृंदा गवंडळकर, रफिक शेख, सुधीर डिचोलकर,ज्ञानेश्वर केळजी, नगरसेवक धर्मराज कांबळी, शितल आंगचेकर, रामकृष्ण सावंत, वृंदा मोर्डेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, मनवेल फर्नांडिस, शैलेश जामदार, रवि शिरसाट आदी पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांनी गुरुवारी वेंगुर्ले तहसिलदार यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
आंतरराष्ट्रीय बाजरातील कच्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना होणाऱ्या आर्थिक ओढाताणीची दखल घेवून केंद्र सरकारने पेट्रोल ७ रुपये व डिझेल १० रुपये या प्रमाणे करात कपात केली आहे. तसेच भाजपा प्रणित राज्य सरकारनीहि पेट्रोल व डिझेल वर सर्वसाधारणपणे प्रत्येकी ७ रुपये कपात केली आहे. त्यामुळे एकुण दरात पेट्रोलवर १२ रुपये आणि डिझेलवर १७ रुपये कपात झाली आहे. आपल्या शेजारच्या गोवा आणि कर्नाटक सरकारनेहि हि कपात केली आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेल मुद्यावरुन आंदोलन व मोर्च काढतात पण पेट्रोल व डिझेल विक्रीत राज्य सरकारला मिळणाऱ्या कराच्या वाट्यात कपात करुन सर्वसामान्याना कुठलाही दिलासा देत नाहित हे निषेधार्ह आहे. त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करुन सर्वसामान्याना दिलासा द्यावा. अन्यथा भाजपा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.