You are currently viewing आमदार-खासदार पालकमंत्री यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचे सुख दुःख नाही.;बनी नाडकर्णी.

आमदार-खासदार पालकमंत्री यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचे सुख दुःख नाही.;बनी नाडकर्णी.

कुडाळ /-

सध्या संपूर्ण महाराष्ट्रची एसटी वाहतूक बंद असताना व सर्व कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संप पुकारलेल्या असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक मंत्री ,आमदार व खासदार यांना एसटीच्या कामगारांच्या दुःखात सहभागी व्हायला वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे
कुडाळ पासूनअवघ्या काही अंतरावर असलेल्या घावनाळे गावात शिवसेनेचा मेळावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्री ,खासदार व आमदार यांना पाच मिनिट कुडाळ आगाराला भेट देऊन कामगारांच्या अडीअडचणी जाणून घ्यायला वेळ नाही. ज्या कामगारांच्या जीवावर संपूर्ण प्रवाशांचे दळणवळण चालू असते ,त्या कामगारांना आज या मंडळींनी उघड्यावर टाकलेले आहे एसटी कामगारांची ताकत काय असते व ते काय करू शकतात त्याची कल्पना त्या मंडळींना नसावी. गाव तिथे एसटी असे असल्यामुळे त्या एसटी वाहक व चालक यांचे रोज संपूर्ण जिल्ह्याच्या प्रवाशांबरोबर संपर्क येत असतो, व त्यांचे सगळ्यात जास्त प्रवाशांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असतात, त्यामुळे एखाद्या सत्तेत असलेल्याआमदार-खासदारांना खुर्चीवरून पण खाली खेचण्याची ताकत या एसटी कर्मचाऱ्याकडे असते आणि ती ताकत येत्या काळात ते दाखवू शकतात, कारण आज खरोखर त्यांना मानसिक आधाराची गरज आहे व ती योग्यवेळी त्यांना जर दिली तर ते नक्कीच त्याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही . एरवी प्रत्येक सणात घरो घरीं जाऊन सगळे सण साजरे करायला वेळ काढणाऱ्या मंडळी ला आज कामगारांन साठी वेळ का नाहीं असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगारसेनेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी पत्रकारांशी बोलतात सांगितले.

अभिप्राय द्या..