You are currently viewing उपवडे वासियांचे स्वप्न आमदार वैभव नाईक यांनी केले पूर्ण दुकानवाड उपवडे मार्गावरील मोठ्या पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर..

उपवडे वासियांचे स्वप्न आमदार वैभव नाईक यांनी केले पूर्ण दुकानवाड उपवडे मार्गावरील मोठ्या पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर..

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील दुकानवाड उपवडे ग्रामीण मार्ग २०६ वर कर्ली नदीवर मोठा पूल मंजूर झाला आहे. याठिकाणी मोठा पूल नसल्याने पावसाळयात येथील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटत होता. मोठा पूल मंजूर करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. ग्रामपंचायत निवणुकीवेळी तसेच पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांनी येथील ग्रामस्थांना पूल मंजूर करण्याचा शब्द दिला होता. अखेर आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून नाबार्ड २७ योजनेअंतर्गत दुकानवाड उपवडे मार्गावरील पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण, पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून उपवडे वासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हा पूल होण्यासाठी पं.स.सदस्या श्रेया परब, बाळा म्हाडगूत, सागर म्हाडगूत, कृष्णा धुरी, रामभाऊ धुरी, सरपंच अजित परब सुधीर राऊळ, संतोष राऊळ, महादेव राऊळ, सदानंद गवस यांसह उपवडेतील शिवसेना लोकप्रतिनिधींनी आ. वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

अभिप्राय द्या..