You are currently viewing मठ येथे विद्युतप्रवाह अचानक वाढल्याने वीज मीटर जळून नुकसान –

मठ येथे विद्युतप्रवाह अचानक वाढल्याने वीज मीटर जळून नुकसान –

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील
११ केव्ही विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाह आज सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास अचानक वाढल्याने येथील विजग्राहकांचे वीज मीटर सह घरातील विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले आहे.सदर वीज ग्राहकांना त्वरित वीज मीटर मोफत बसवून मिळावेत व वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वीज वितरण कडे केली आहे.सदर वीज ग्राहकांमध्ये विद्याधर गावडे, सतीश गावडे, रमेश कडुलकर, सुभाष कडुलकर यांचे वीज मीटर तर सतीश गावडे यांचे वायफाय कनेक्शन, नित्यानंद शेणई, यांच्या घरातील बल्ब वगैरे विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले आहे. तरी वीज वितरण कंपनीने सदर वीज मीटर विना मोबदला ग्राहकांना बसवून देऊन वीज पुरवठा नियमित करावा,अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..