You are currently viewing शेर्पे सहकारी संस्थेला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली सदिच्छा भेट…

शेर्पे सहकारी संस्थेला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली सदिच्छा भेट…

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील ‘श्री आकार ब्राह्मणदेव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित शेर्पे ‘ या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. व संस्थेच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शेर्पे दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा राऊत, उपाध्यक्ष प्रकाश नमसे संस्थेचे सचिव संजय कापसे यांच्या हस्ते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, या छोट्याशा ग्रामीण भागात असलेल्या शेतकरी सहकारी संस्थेची प्रगती चांगली असून, अधिका अधिक शेतकऱ्याचे दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य जिल्हा बँकेच्या वतीने करण्यास आम्ही सदैव तयार असल्याचे सतीश सावंत यांनी सांहितले. तर संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. असे देखील सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..