You are currently viewing बैलाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रामचंद्र शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे आम.वैभव नाईक यांनी केले सांत्वन

बैलाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रामचंद्र शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे आम.वैभव नाईक यांनी केले सांत्वन

शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन..

कुडाळ /-

रांगणा तुळसुली येथे बैलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विलास रामचंद्र शेटये यांचा मृत्यू झाला होता. आज रांगणा तुळसुली येथील शेटये कुटुंबियांच्या घरी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेत प्रमोद विलास शेटये हे देखील गंभीर जखमी झाले होते. आ. वैभव नाईक यांनी त्यांची विचारपूस करत कुटुबियांना धीर दिला व शेटये कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..