You are currently viewing नंदकिशोर काळे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार..

नंदकिशोर काळे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार..

सिंधुदुर्ग /-

नंदकिशोर काळे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांचे सिंधुदुर्ग विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि आचरा तलाठी अनिल काळे, नंदकिशोर काळे यांचे बालपणी चे मित्र आणि चिपळूण येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले संजय चव्हाण आदी उपस्थित होते. या अगोदर नंदकिशोर काळे यांनी हिंगोली, यवतमाळ, लातूर, सोलापूर, पूणे जिल्हा येथे सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून काम केले आहे. ते पदोन्नतीने सिंधुदुर्ग येथे हजर झाले आहेत.

सिबदरा नांदेड येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नंदकिशोर बाबूराव काळे यांनी गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही. जिद्द आणि मेहनतीने आपण उन्नती करु शकतो, हे सिद्ध केले आहे. सिबदरा येथिल बाबूराव काळे यांची चारही मुले प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. नंदकुमार काळे हे परिवहन सेवेत सोमवार पासून कार्यरत झालेत. त्यांचे दुसरे भाऊ अनिल काळे हे महसूल सेवेत आचरा येथे तलाठी पदावर कार्यरत आहेत. तिसरा भाऊ संदीप काळे हे वसमत येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर चौथा भाऊ पालघर येथे पोलीस सेवेत उपविभागीय पदावर कार्यरत आहेत.

अभिप्राय द्या..