You are currently viewing बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे रस्त्यांची कामे रखडली.;भाजपाच्या शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता यांना भेट..

बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे रस्त्यांची कामे रखडली.;भाजपाच्या शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता यांना भेट..

दोडामार्ग /-

बांदा दोडामार्ग आयी व दोडामार्ग विजघर तसेच दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व रस्त्यांच्या वस्तुस्थितीची माहीती जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले. यावेळी अनेक धक्कादायक बाबींचा उलघडा झाला.यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दफ्तर दिरंगाईचा फटका दोडामार्ग तालुक्यातील विकास कामांना बसत असून बांदा दोडामार्ग आयी रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी मक्तेदारांनी साधारणपणे १८% जादा दराने निविदा भरल्या असल्याने व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी न मिळाल्याने बांदा दोडामार्ग आयी रस्त्याच्या निविदा आजमितीस मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्या स्तरावर मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडुन अद्यापही निविदेच्या आर्थिक देकाराबाबत मक्तेदारांस विचारणा सुरु आहे.त्यामुळे या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी मक्तेदारांना अद्यापही कार्यारंभ आदेश दिले नसल्याची बाब आजच्या भेटीत उघड झाली.बांदा दोडामार्ग आयी रस्त्यासाठी दोडामार्ग तालुक्यातुन विविध स्तरावरुन बरीच आंदोलने झाली या सर्व आंदोलकांना धातूरमातुर उत्तरे देवून टोलविण्याचे काम आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे.आतापर्यंत काहीवेळा पावसाळा संपल्यानंतर तर काही वेळा दिवाळीनंतर या रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात येईल असे सांगणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप निविदाच मंजूरी न मिळाल्याने या कामांना नेमकी कधी सुरुवात करण्यात येईल याबाबत साशंकताच निर्माण झाली आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील विकासकांबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असलेला वेळकाढूपणा तसेच वेळेत निविदा मंजुर न होणे,निविदा मंजूर कामांना कार्यारंभ आदेश न देणे अशा विविध तांत्रिक कारणांमुळे दिवसेंदिवस दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न जटील होत चालला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबी दिनांक ०८/११/२०२१ रोजी पर्यंत मार्गी न लावल्यास भारतीय जनता पार्टी दोडामार्ग दिनांक ०८/११/२०२१ पासून उपोषण व ठिय्या आंदोलन करणार आहे.याची माहीती आम्ही कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना लेखी पत्राने दिलेली आहे. यावेळी तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,पंचायत समिती सदस्य बाळा नाईक,जिल्हा कार्यकारीणी सदस्य राजेंद्र निंबाळकर,शैलेश दळवी,युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण,युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष दिपक गवस,तालुका सरचिटणीस दादा पालयेकर,मणेरी सरपंच विशांत तळावडेकर,अनिल शेटकर, पिकी कवठणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..