You are currently viewing प्रलंबित विकासकामे,कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मिळणारी उद्धट वागणूक या विरोधात कुडाळ शहरभाजपच्या वतीने नगरपंचायतला घेराव..

प्रलंबित विकासकामे,कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मिळणारी उद्धट वागणूक या विरोधात कुडाळ शहरभाजपच्या वतीने नगरपंचायतला घेराव..

संबंधित प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा कुडाळ शहर भाजपाच्यावतीने कुडाळ नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला..

कुडाळ /-

शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ नगरपंचायती च्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शहरातील सेल्फी पॉईंट स्वच्छता ,भैरववाडी येथील गतिरोधक, कुडाळ शहरातील बंद अवस्थेत असणारे स्ट्रीट लाईट बाबत होणारे दुर्लक्ष, शहरातील स्वच्छता तसेच गांधी चौक सुशोभिकरण काम व इतर प्रलंबित असणारी कामे तातडीने सुरु करण्याबाबत तसेच कुडाळ शहरातील नागरिकांना काही कर्मचार्‍यांकडून मिळणारी उद्धट वागणूक आणि काही कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक या दृष्टीने जाब विचारण्यात आला व याबाबत निवेदन देण्यात आले येत्या काही दिवसात सदर प्रश्नांवर तातडीने लक्ष घालून समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडू असा इशारा भारतीय जनता पार्टी कुडाळ शहर च्या वतीने देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे ,महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,शहराध्यक्ष राकेश कांदे , भाजपा नेत्या दीप्ती पडते, बंड्या सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, महिला शहराध्यक्ष ममता धुरी ,शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, निलेश परब, राजू बक्षी ,राजेश पडते, युवा मोर्चा अध्यक्ष वरू राणे, राजवीर पाटील, आदिती सावंत ,मुक्ती परब, रेवती राणे यांचा सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नगरपंचायत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते व तातडीने सर्व समस्या काही दिवसात सोडविल्या जातील असे आश्‍वासन नगरपंचायत अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

अभिप्राय द्या..