You are currently viewing जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी, पत्रकार यांनी राबविली स्वच्छता मोहीम..

जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी, पत्रकार यांनी राबविली स्वच्छता मोहीम..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषद परिसर केला स्वच्छ
सिंधुदुर्गनगरी ता ०१ जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांनी आज जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबउन परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज ०१ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी व पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुख्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद पदाधिकारी महेंद्र चव्हाण, शर्वांनी गावकर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विनायक ठाकूर, मदन भिसे, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, कर्मचारी तसेच ओरोस सरपंच प्रीती देसाई,जिल्हा मुख्यालय पत्रकार या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्राम पंचायतीनी आपल्या स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करावे.असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..