सिंधुदुर्गनगरी /-

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन;विविध १६ प्रश्नांकडे वेधले लक्ष
ओरोस-:स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने धरणे आंदोलन करीत निदर्शने केली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने धरणे आंदोलन करीत एकूण १६ मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेले हे आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होते. विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या मंजूर करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आदींना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मधील इयत्ता 1ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावा, मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील मुलींना एक रुपया ऐवजी 25 रूपये उपस्थिती भत्ता लागू करावा, शिक्षण सेवक यांचे मानधन 6000 रुपयांवरून 25 हजार रूपये करणे, सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांबाबतच्या त्रुटी दूर कराव्यात, वस्तीवाळा शिक्षकांची सुरूवातीची नियुक्ती तारीख सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अंशदान पेन्शन धारक शिक्षकांच्या वेतनातून कपात झालेल्या रक्कमांचा हिशोब घोळ पूर्ण करावा, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, 13 आॅक्टोबर 2006 चे परिपत्रक रद्द करून सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. जून 2014 ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा शिक्षकामधूनच भरण्यात यावीत, ग्रामीण भागात मुख्यालयी राहण्याचे 9 सप्टेंबर 2019 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आंतरजिल्हा बदली मधील जाचक अटी रद्द करून आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्याची कार्यवाही त्वरीत सुरू करावी, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समिती जिल्हाशाखा सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांचे नेतृत्वाखाली सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत धरणे आंदोलन छेडण्यात आले. या या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर,कोकण विभागीय उपाध्यक्ष शरद नारकर, राज्य संघटक डी बी कदम, राज्य महिला आघाडी सल्लागार सुरेखा कदम, शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा प्रवक्ता सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष नारायण नाईक, उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, कार्यालयीन चिटणीस आपा सावंत, संतोष कुडाळकर, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल जाधव, संपर्क प्रमुख प्रशांत मडगावकर, सुधीर गोसावी, जिल्हाउपाध्यक्ष उदय शिरोडकर, तुषार आरोसकर, प्रकाश झाडे, सुहास रावराणे, गिल्बर्ट फर्नांडीस व सर्व तालुकाशाखांचे तालुकाध्यक्ष व सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page