You are currently viewing राष्ट्रवादीकाँग्रेस कडून बांदा वासीयांना 30 ऑक्टोबरला बोट सुपूर्त करण्यात येणार.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

राष्ट्रवादीकाँग्रेस कडून बांदा वासीयांना 30 ऑक्टोबरला बोट सुपूर्त करण्यात येणार.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र राज्य मंत्री जयंत पाटील शनिवारी दिनांक ३० रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.सांयकाळी 5 वाजता ते बांदा ओवेस काॅम्प्लेक्स येथे येणार आहेत.

यावेळी पाटील यांच्या हस्ते बोट सुपूर्त करण्यात येणार आहे.बांदा येथे आलेल्या पुराने व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली होती.नुकसानीची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी कार्यकर्त्यासमवेत नूकसानीची पहाणी करण्यासाठी आले होते.यावेळी बांदा येथील राकेश केसरकर,प्रीतम हरमलकर यांनी पुराचे पाणी पहाटे आल्याने ‌व बचावासाठी कोणतेही साधन नसल्याने मोठी नुकसानी झाली.जर बोट वगेरेची व्यवस्था असली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली नसती.

व्यापाऱ्यांची व्यथा ऐकल्यावर सामाजिक बांधीलकी राखत श्री. सामंत यांनी बांदा व इन्सुलीसाठी लाईफ जॅकेट,सायरन,बोट देण्याचे आश्वासन दिले होते.सामंत यांनी त्वरीत बांदा इन्सुली वासीयांना लाईफ जॅकेट व सायरन सुपूर्त केले. शनिवार दिनांक ३० रोजी सायंकाळी 5 वाजता जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा वासीयांना बोट सुपूर्त करुन करणार आश्वासनाची पूर्तता करण्यात येणार आहे. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.लवकरच इन्सुली वासी यांनाही बोट सुपूर्त करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला बांदा तसेच बांदा परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अमीत सामंत सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..