कणकवली /-
भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेच्या आवारात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे मार्गदर्शन स्टॉल असणार आहेत . तसेच यावेळी एसबीआय लाईफ , जनरल इन्शुरन्स , म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीवर मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे . या मेळाव्याला सर्व नोकरदार , उद्योजक , युवक- युवती , माहिला वर्ग , शेतकरी व ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी . अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेशी या संपर्क साधावा , असे आवाहन कणकवली शाखा व्यवस्थापकांमार्फत करण्यात आले आहे.
