चौके /-

मालवण तालुक्यातील नांदरुख – नाईकवाडी येथे तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा शेतीचा बैल मृत्यूमुखी पडला. सुदैवाने बैलाला वाचविण्यास गेलेले शेतकरी पती पत्नी बचावले. सोमवारी सकाळी नांदरुख – नाईकवाडी येथील शेतकरी विजय अनंत चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी रानात सोडण्यास जात असताना घराच्या अवघ्या काही अतंरावर गेले असता तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा बैलाला स्पर्श झाल्याने बैल विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यूमुखी पडला. बैलाला वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी विजय आणि त्यांची पत्नी यानाही काहीसा विजेचा धक्का बसला. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. सदर घटनेची कल्पना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देऊन वीजपुरवठा बंद करण्यात आला. घटनास्थळी नांदरुख सरपंच, तलाठी यांनी पहाणी केली तर पशुवैद्यकिय अधिकारी, वीज वितरण अधिकारी, पोलिस यांनी घटनेचा ठिकाणी येऊन पंचनामा केला. शेतकरी विजय चव्हाण यांचा सुमारे ४५०००/- रुपये किमतीचा बैल मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page