नवी दिल्ली /-
▪️ देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3 कोटींवर पोहोचली आहे.
▪️ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सादर केलेल्या तिमाही अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या इंटरनेट युजर्सपैकी 52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
▪️ *ट्रायच्या अहवालानुसार* : देशातील इंटरनेट युजर्सपैकी पहिल्या स्थानी जिओ असून त्यांचे 52.3 टक्के युजर्स आहेत. 23.6 टक्क्यांसह भारती एअरटेल दुसऱ्यास्थानी तर व्होडाफोन-आयडियाची 18.7 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.
▪️ *युजर्सची संख्या* : यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीत इंटरनेट युजर्सची एकूण संख्या 71.8 कोटी होती. ज्यामध्ये मार्च 2020 मध्ये 3.40 टक्के वाढ होऊन एकूण संख्या 74.3 कोटींवर पोहोचली.
*वायरलेस ग्राहकांची संख्या* : वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 72.07 कोटी असून जी एकूण ग्राहकांच्या संख्येपैकी 97 टक्के होती. तर वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2.24 कोटी होती.