आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /-

आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.आंबोलीत गेल्या आठवड्यात 350 इंच पावसाचा ठप्पा पार केला होता. गेल्यावर्षी एकूण पावसाची नोंद ४०० इंचाहून जास्त झाली होती. यावर्षी देखील पाऊस आपला रेकॉर्ड पार करणार असल्याचा अदांज वर्तवला जात आहे.घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असला तरी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पडझड झालेली नाही आहे. गेले १५ दिवस संततधार पावसामुळे आंबोलीत पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तसेच गेले दहा दिवसात आंबोलीत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली नाही आहे.त्यामुळे ही बाब आंबोलीला दिलासा देणारी आहे. तसेच आंबोलीत प्रत्येक वाडीवार खबरदारी घेऊन काम केले जात आहे.

अभिप्राय द्या..