You are currently viewing आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा /-

आचरा–अर्जुन बापर्डेकर
वाढत्या अवैध वाहतूकीला आळा बसावा या उद्देशाने आचरा पारवाडी पुलावर देवगड आणि आचरा पोलीसांनी शुक्रवारी रात्री अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.
ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या दारुचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच काही अवैध व्यवसायांनाही ऊत आल्याची बोंब मारली जात आहे.या द्रूष्टीने देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या सह दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी आचरा पारवाडी पुलावर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केली होती. यात आचरा पोलीस स्टेशनचे अक्षय धेंडे,जगताप आदी सहभागी झाले होते. यावेळी चारचाकी, टूव्हीलर वाहनचालकांची पोलीसांकडून कसून तपासणी केली जात होती. यामुळे याभागातून जाणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.

अभिप्राय द्या..