राज्यसभेतील ‘या’ आठ खासदारांचे निलंबन..

राज्यसभेतील ‘या’ आठ खासदारांचे निलंबन..

नवी दिल्ली /-

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे.राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे.

या आठ खासदारांना निलंबित केले–

डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे. सभापती म्हणाले की, ‘राज्यसभेसाठी हा आजपर्यंतचा सर्वात खराब दिवस होता.काही खासदारांनी सभागृहात पेपर फेकले. माइक तोडला. रूल बुक फेकले. या घटनेमुळे मला अतिशय दु:ख झाले आहे.

अभिप्राय द्या..