You are currently viewing हिंदू कॉलनी येथे भाजपच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रम संपन्न..

हिंदू कॉलनी येथे भाजपच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /-

श्री साई मंदिर, हिंदु कॉलनी, कुडाळ येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रमाचे महिला मोर्चा सरचिटणीस सौ.अक्षता कुडाळकर यांनी आयोजन केले. यावेळी उपस्थित महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रम करुन भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला . तसेच सर्वांनी प्रसाद आपल्या घरुन आणून एकत्र मिळून वाटून खाल्ला.आठले मॅडमनी जुन्या लहानपणच्या भोंडल्याच्या आठवणी सांगितल्या.सर्वजणी एकत्रित येऊन सुंदर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस सौ.रेखा काणेकर,
तालुका चिटणीस सौ.रेवती राणे, सौ.अश्विनी गावडे, शहर उपाध्यक्ष सौ.मुक्ती परब,सौ.तेजस्विनी वैद्य,शहर चिटणीस,
सौ.विशाखा कुलकर्णी, सौ.प्राची आठल्ये, तसेच प्रेरणा बचत गटाच्या सौ.प्रज्ञा राणे,सौ.अनुराधा पाटणकर,सौ. कविता कुंटे,सौ.गौरी राऊळ,सौ.प्रिती नातु,सौ.सुवर्ण प्रभू तेंडोलकर सौ.मृणाल देसाई आदी उपस्थित होत्या .

अभिप्राय द्या..