You are currently viewing परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील मुलींची छेड काडल्याप्रकर्णी आकाश फिश मिल कंपनीच्या दोन परप्रांतीय कामगारांना मुलींकडून चोप..

परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील मुलींची छेड काडल्याप्रकर्णी आकाश फिश मिल कंपनीच्या दोन परप्रांतीय कामगारांना मुलींकडून चोप..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस धक्का येथील आकाश फिश मिल परिसरात खवणे समुद्र किनाऱ्यावर (ब्रिजकडे) जाणाऱ्या रस्त्यावर आकाश फिश मिल कंपनीच्या दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींची छेड काढल्याने,त्या परप्रांतीय असलेल्या दोन कामगारांना संतप्त झालेल्या त्या पाचही मुलींनी चपल्यांचा प्रसाद दिला आहे.

दरम्यान हे दोघेही परप्रांतीय केळुस येथील सडयावर असलेल्या आकाश फिश मिलचे कामगार आहेत.मंगळवार दि.१२ ऑक्टोबर रोजी पाट हायस्कूल मध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या खवणे येथील मुली पाट हायस्कूल सुटल्यानंतर कदंमा गाडीने केळुस धक्का येथे दुपारी १२-३० च्या दरम्यान उतरल्या व आपल्या घरी जात असताना आकाश फिश मिलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी या पाचही मुलींचा पाठलाग करून,छेड काढली.त्यामुळे मुली घाबरल्या व आपल्या खवणे गावात पोहोचल्यानंतर सर्व हकीगत आपल्या आई वडीलांसह ग्रामस्थांना सांगितली.त्यानंतर पालक व ग्रामस्थ संतप्त झाले व सर्व मुलींना आकाश फिश मिल कंपनीकडे घेऊन येऊन,

कंपनीच्या त्या दोन परप्रांतीय असलेल्या कामगारांना ग्रामस्थ व पालकांनी कंपनीच्या गेटच्या बाहेर बोलविल्यानंतर त्या पाचही मुलीं संतप्त झाल्या व त्या दोन परप्रांतीय कामगारांना चपल्यांचा चांगलाच प्रसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा