कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याचीवाडी येथील अनंत सदाशिव तावडे (५५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेची फिर्याद संतोष सदाशिव तावडे ४५ रा. पावशी मिटक्याचीवाडी यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. यानुसार मयत अनंत तावडे यांची मानसिक स्थिती गेल्या एक वर्षापासून काहीशी ठिक नव्हती .यानंतर ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता आपल्या राहत्या घरातील ओट्या वरील लाकडी बारास गळफास लावलेल्या स्थितीत ते आढळून आले. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास हे काॅ. चव्हाण करत आहेत.
