फडणवीस यांच्या बौद्धिकतेवर थोरात यांची टीका..

फडणवीस यांच्या बौद्धिकतेवर थोरात यांची टीका..

मुंबई /-

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका करणे चांगलेच महागात पडले आहे. फडणवीस यांच्या या बौद्धिकतेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. देश रसातळाला गेला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

*थोरात म्हणाले* :

”फडणवीस यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.रसातळाला जाणे म्हणजे काय हे नरेंद्र मोदी यांनी देशाला दाखवून दिले आहे.डॉ. मनमोहन सिंह बोलतात तेव्हा संपूर्ण जग ऐकते, अशी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष यांची प्रतिक्रिया आहे. अशा नेत्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे म्हणजे त्यांच्या बौद्धिकतेची किव वाटते.

अभिप्राय द्या..