रत्नागिरी/-

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागत आहे.मात्र जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील गोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. यातून जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार रुग्णांच्या जीवाशी कसे खेळत आहेत ते समोर येते.

सुनील गुप्ता याच्या रायगड गॅसेस या कंपनीचा ऑक्सिजन जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी करिता मागविला होता. रत्नागिरी जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज दिवसाला 15 टन एवढी आहे. मात्र 10 टन ऑक्सिजनची कमतरता आहे. भविष्य काळात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजनची गरज देखील वाढणार आहे. मात्र सरकारला जनतेचे होत असलेले हाल दिसत नाही आहेत.

राज्य सरकारला कंपन्यांचे हित जोपासताना दिसत आहे. कारण रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी गुप्ता याच्या रायगड गॅसेसकडून मागविलेली ऑक्सिजनची गाडी ऑक्सिजन न उतरवताच निघून गेली. वैद्यकीय उपचारासाठी असणाऱ्या ऑक्सिजनसाठी कमी किंमत मिळते तर तोच ऑक्सिजन जर इंडस्ट्रीत म्हणजेच उद्योगासाठी दिला गेला तर त्याच ऑक्सिजनची किंमत वाढते. त्यामुळे या सुनील गुप्ताने मुख्य सचिव आणि मंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून ती ऑक्सिजनची गाडी रत्नागिरीतून सोडवून घेतली. हाच सुनील गुप्ता लोटे येथील एमआयडीसी मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतो. त्यामुळे अधिकचा नफा मिळवण्यासाठी दबावाचा वापर करून जिल्ह्यातील जनतेला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे, असा निलेश राणे यांनी आरोप केला आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निलेश राणे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page