वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक संदेश निकम व नगरसेविका सुमन निकम यांनी ज्यांना कोरोनामुळे व्यवसाय करता येऊ शकला नाही तसेच रोजगार न मिळाल्याने आर्थिकदृष्टय़ा अडचण निर्माण झालेल्या शहरातील गोरगरीब अशा ५० नागरिकांना प्राधान्याने गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे मोफत वाटप केले.
यावेळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले, मच्छीमार नेते हेमंत मलबारी, वेदांत पेडणेकर, उमेश पेडणेकर, राजन पवार,मयेकर, राजू परूळेकर, अविनाश सडवेलकर, मनोहर राऊत, मुळीक, नाना राऊत आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संदेश निकम यांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या वेळी व्यवसाय वा रोजगारापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना किराणा साहित्य असेच मोफत वाटप केले होते. तसेच मदतही केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page