You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मधील सोहेब खान भाजपा मध्ये दाखल..

राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मधील सोहेब खान भाजपा मध्ये दाखल..

कुडाळ /-


शहर पानबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोहेब खान यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला भाजपा नेते नारायणराव राणे साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून यापूर्वी ते राजकीय कामही करत होते .परंतु त्यानंतर ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि स्वगृही दाखल झाले त्यावेळी पक्ष संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून राणे साहेबांचे आशीर्वाद घेऊन पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यरत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली .यावेळी तालुकाअध्यक्ष विनायक राणे ,युवा नेते आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर ,शहराध्यक्ष राकेश कांदे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे ,माजी सरपंच प्रशांत राणे ,राकेश नेमळेकर राजवीर पाटील उपस्थित होते.

अभिप्राय द्या..