You are currently viewing शिवगंगा नदी पात्रात पुणे येथील तरुण वाहून बेपत्ता..

शिवगंगा नदी पात्रात पुणे येथील तरुण वाहून बेपत्ता..

वैभववाडी: /-

लोरे नं 2 येथील शिवगंगा नदी पात्रात पोहताना पुरात पिंपरी-चिंचवड,पुणे येथील तरुण वाहून बेपत्ता झाला आहे. भूषण लॉंमवेल नाईक वय वर्षे 44 असे त्याचे नाव आहे.ही घटना शनिवारी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
लोरे येथील मित्रा सोबत लोरे शिवगंगा नदी पात्रात भूषण लॉंमवेल नाईक व त्याचे मित्र पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते.अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तो पाण्यात वाहून गेला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी तहसीलदार रामदास झळके ,मंडळ अधिकारी कदम,तलाठी बडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खाडे, राहुल पवार,संतोष शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.घटनास्थळी व परिसरात शोध मोहीम सुरू आहे.करूळ येथील जीव रक्षक टीम शोध घेण्यासाठी दाखल झाली आहे.दुपारी 1:30 वाजे पर्यंत भुषण चा मृतदेह मिळाला नव्हता.

अभिप्राय द्या..