वैभववाडी/

नाधवडे येथून बेपत्ता विवाहित महिला अर्पणा अनिल पाडावे वय 35 ही खारेपाटण येथून वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाली.मात्र तिने नवऱ्या बरोबर राहण्यास नकार दिला.नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथून 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या भावाच्या घरातून नदीवर कपडे धुण्यासाठी जाते असे सांगून ती बेपत्ता झाली होती.

सोनाळी येथील अनिल पाडावे यांच्या बरोबर तिचा सुमारे 15 वर्षा पूर्वी विवाह झाला होता.त्यांना दोन मुलगे आहेत. इयत्ता आठवी व सहावी मध्ये शिकत आहेत.सद्या ते वडिलांबरोबर सोनाळी येथे राहत आहेत.गेले काही वर्षे त्यांच्यामध्ये भांडणे होत असल्याने ती माहेरी नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथे आई – वडिलांकडे राहत होती.गेले 3 दिवस ती खारेपाटण येथील मानलेल्या वहिणीकडे ती राहत होती.दोन दिवसापूर्वी तिने वर्तमान पत्रातील आपल्या नावाने बेपत्ता असल्याची बातमी वाचून ती शुक्रवारी सकाळी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.यावेळी तिची मानलेली वहिनी बरोबर होती. वैभववाडी पोलीस स्टेशन येथे तिचा भाऊ व नातेवाईकांनी तिला पती बरोबर राहण्याची विनंती केली तरी तिने राहण्यास नकार दिला.त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब लिहून घेतला.त्यानंतर ती महिला व तिची मानलेली वहिनी खारेपाटण येथे कायम राहण्यासाठी गेली.या घटनेची फिर्याद तिचा भाऊ गुरूप्रसाद चंद्रकांत मुद्रस यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.या घटनेचा तपास पोलीस नाईक गिरीष तळेकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page