मुंबई /-
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे.