You are currently viewing एन एम एम एस गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ..

एन एम एम एस गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ..

कुडाळ /-

सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शामराव कोरे मुख्याध्यापक यांनी केले. राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती कार्यक्रम पाट हासस्कूल मध्ये संपन्न झाला .पाट केंद्रप्रमुख श्री रेडकर गुरुजी, संस्था चेअरमन श्री रेडकर गुरुजी, संस्था सचिव सन्माननीय सामंत सर, पर्यवेक्षक श्री हंजनकर सर सर्व शिक्षक पालक आणि एन एम एम एस या परीक्षेच्या गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते .या परीक्षेला मिळणाऱ्या गुणां बरोबर इतरही कला आत्मसात करा .त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने ही गुणवंत मुले आहेत .या शिष्यवृत्ती मधुन चांगल्या प्रकारची आर्थिक मदत त्यांना मिळेल .या मुलांच्या गुणवत्तेत यामुळे वाढ होईल. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन श्री सामंत सर यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक श्री राजीवी तेजम. सौ अंकिता तेली. त्याचप्रमाणे श्री मोंडकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिक्षक सौ बुरुड एन.आर. श्री कांबळे, श्री सांगळे एम आर ,सौ चव्हाण एस जी, सौ सामंत डीडी ,श्री हाके ए .के .श्री .बोंदर सर यांचेही अभिनंदन करण्यात आले .या कार्यक्रमात कुमारी समीक्षा तेजम ,कु,पार्थ गोसावी, कु.सलोनी तेली .कुमारी सुहानी मोंडकर या विद्यार्थ्यांचा संस्था आणि विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ बुरुड मॅडम तर आभार प्रदर्शन श्री हंजनकर सर यांनी केले,

अभिप्राय द्या..