You are currently viewing NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत वराडकर हायस्कूल विद्यार्थ्यांचे यश !!!

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत वराडकर हायस्कूल विद्यार्थ्यांचे यश !!!

मालवण /-

सन 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या NATIONAL MEANS CUM-MERIT SCHOLARSHIP परीक्षेत कट्टा, मालवण येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ता. मालवण प्रशालेतील
कुमारी मलिष्का देवेंद्र लोहार हिने जिल्ह्यात एन.टी. ब-२ प्रवर्गातून शिष्यवृत्ती प्राप्त केली तर
कुमार निखिल सुनील कदम याने जिल्ह्यात एस्.सी. प्रवर्गातून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन होत आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे विश्वस्त नोटरी ऍड. एस. एस. पवार, डॉ.व्ही.सी. वराडकर अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, प्रशांत टेंबुलकर सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई आणि खाजनिस श्याम पावसकर तसेच सर्व संचालक, स्कुल कमिटी अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नंदकुमार कांबळे, वर्गशिक्षक भाट, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मार्गदर्शन लाभले.

अभिप्राय द्या..