You are currently viewing मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा..

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा..

मालवण /-

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारिणीची बैठक मालवण पत्रकार कक्ष येथे संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोकण विभागीय सचिव जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बंटी केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, यासह प्रफुल्ल देसाई, अमित खोत, कुणाल मांजरेकर, मंगेश नलावडे, अनिल तोंडवळकर, नितीन गावडे, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात निधन झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहत सभेच कामकाज सुरू करण्यात आले. जिल्हा पत्रकार संघाच्या निकषानुसार प्राप्त तीन नवीन सदस्यांचे प्रस्ताव स्वीकारून ते जिल्हा स्तरावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मालवण तालुक्यातील पत्रकार समिती सदस्यांच्या दहावी, बारावी व विविध स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्याचा आला.

तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा

आगामी गणेशोत्सव काळात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, व रोख स्वरूपात विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीनी गणेश सजावटीचे फोटो पत्रकार अमित खोत : ९४०४४५७७८८, नितीन गावडे : ७७५८०६३०३२ यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नंबरवर पाठवावेत. अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर, अमोल गोसावी यासह दोन तज्ञ व्यक्ती ही पाच सदस्यीय परीक्षक टीम प्राप्त फोटो मधून अंतिम ११ फोटो निवडून त्यांचे प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी जाऊन गणेशोत्सवातील सातवा दिवस ते दहावा दिवस या कालावधीत परीक्षण करेल. त्यानंतर अध्यक्ष संतोष गावडे यांच्या वतीने अंतिम निकाल जाहीर केला जाईल. सर्वोत्तम सामाजिक संदेश देणाऱ्या गणेश सजावटीला जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांच्या वतीने विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन

मालवण तालुक्यातील विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी व्हावेत एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत त्यांनीही उज्वल यश संपादन करावे. यासाठी तेथील मुलांना मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने मालवण पत्रकार समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांना बोलावून मार्गदर्शने आयोजित करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे, याबाबत काम करण्यासाठी मालवण पत्रकार समितीच्या वतीने पाच सदस्यीय कमिटी अर्जुन बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आली आहे. यात विद्याधर (बंटी) केनवडेकर, अमित खोत, सिद्धेश आचरेकर, नितीन गावडे, झुंजार पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहितीही अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

मालवण आदर्श पत्रकार समिती ठरेल

सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार संघाच्या ध्येय धोरणानुसार मालवण पत्रकार समिती काम करत असताना पत्रकारांच्या सन्मानासाठी विविध स्तरावर काम करणे, सामाजिक, शैक्षणिक स्तरावर विविध उपक्रम राबविणे, सर्वांना सोबत घेऊन आदर्शवत असे काम करणे. या दृष्टीने मालवण तालुका पत्रकार समितीचे कार्य चालू राहिली. निश्चितच मालवण तालुका पत्रकार समिती राज्यात आदर्श ठरेल असे काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष गावडे यांनी माहिती देताना स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा