वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत मुदत

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित “ई लिलाव प्रक्रिया” नागरीकांना २० ऑगस्ट पासून eauction.gov.in या संकेतस्थळावरती अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध होतील. अर्ज सादर करण्याची मुदत ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल. या दरम्यान अर्ज सादर केलेल्या व ३ सप्टेंबर रोजी सायं. ६.०० वाजेपर्यंत धनाकर्ष सादर केलेल्या लिलावधारकांना दि. ७ सप्टेंबर रोजीच्या प्रत्यक्ष ई लिलाव प्रक्रियेमध्ये संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार भाग घेता येईल, असे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे.
वेंगुर्ला न.प. मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया जुलै २०२१ मध्ये राबविली होती. या प्रक्रियेस जुन्या मच्छिमार्केट मधील गाळेधारकांनी स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्याद्वारे नगरविकास मंत्र्याकडे आपल्यावर या प्रक्रियेत अन्याय होत असल्याबाबतचे निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने व लिलाव प्रक्रियेत मोठया प्रमाणात स्थानिक नागरीक समाविष्ट झालेले असताना तसेच लोकांचा पैसा मोठ्या प्रमाणात अनामत ठेव स्वरुपात नगरपरिषदेकडे भरणा केला असतानाही या प्रक्रियेस नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आली व तदनंतर जुन्या गाळेधारकांना 1st Right to Refusal चे तत्य लागू करुन जुनी लिलाव प्रक्रिया रद्द करून नवीन सुधारीत जाहिरात प्रसिध्द करण्याबाबतचे आदेश नगरपरिषदेला प्राप्त झालेले आहेत.ज्या लिलावधारकांनी या अगोरदरच्या लिलावात भाग घेवून लिलावाकरिताचे धनाकर्ष (डी.डी.) या अगोदरच नगरपरिषद कार्यालयात जमा केलेले आहेत. त्यांनी त्याच धनाकर्षचे फोटो नवीन लिलावामध्ये अर्ज सादर करताना संकेतस्थळावरती अपलोड करावयाचे आहेत. तसेच ज्यांच्याकडे नगरपरिषद कार्यालयाकडे जमा कलेल्या धनाकर्षचे फोटो नसतील त्यांना त्याचे धनाकर्षाचे फोटो नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध करून दिले जातील. जुन्या लिलावधारकांव्यतिरिक्त अन्य इतर व्यक्तीनाही नियम व अटींची पूर्तता करुन व योग्य ते शुल्क आकारून यामध्ये भाग घेता येईल.ही लिलाव प्रक्रिया जुन्या मच्छिमार्केट गाळेधाराकांना 1 Right to Refusal या तत्वानुसार पार पडणार आहे. 1st Right to Refusal म्हणजेच एखादया गाळयासाठी भाग घेतलेल्या सर्व लिलाव धारकांमधून जी सर्वोच्च बोली लागेल त्या बोलीची रक्कम त्या क्रमांकाच्या गाळयांसाठी नगरपरिषद कार्यालयाच्या अभिलेखावरती नोंद असणा-या व्यक्तीने भरण्याबाबत तयारी दर्शविली तर त्यांना गाळा वितरित करण्यात येईल. याकरिता त्या क्रमांकाच्या गाळ्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सदर व्यक्तीचा (जुन्या गाळेधारकाचा सहभाग असणे आवश्यक आहे. नाहीतर तो गाळा सर्वोच्च बोली लावणा-या लिलावधारकांना वितरित करण्यात येईल.जुन्या लिलावधारकांना या नवीन लिलावात भाग घेण्याकरिता जुने धनाकर्ष वापरता येणार असल्याने व त्याकरिता अतिरिक्तचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप लक्ष्मण गिरप यांनी केलेले आहे.

अभिप्राय द्या..