You are currently viewing भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एमटीडीसीच्या कामाची होणार चौकशी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एमटीडीसीच्या कामाची होणार चौकशी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /-

सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या कामात अपहार झाल्याचे प्राथमिक तपासणीत सिद्ध होत आहे.त्यामुळे या कामाची चौकशी नक्कीच करू.तसेच स्वतः सावंतवाडीत येऊन त्या कामाची पाहणी करणार आहोत आणि पुढील भूमिका घेणार आहोत, असे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी व भाजपा पदाधिकारी यांची बैठक झाली.यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मनोज नाईक, बंटी पुरोहित उपस्थित होते.

एमटीडीसीच्या माध्यमातून सावंतवाडी उद्यानात झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. याबाबत आपण चौकशीची मागणी केली होती. परंतु कोणतीही दखल न घेतल्यामुळे १५ ऑगस्टला आम्ही सर्व भाजप पदाधिकारी उपोषणाला बसलो होतो. यावेळी आपण या संदर्भात लक्ष घालून योग्य ती चौकशी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या कामाचा दर्जा तपासा, अशी मागणी केली. दरम्यान या कामात अपहार झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..