भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी “होमियोपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल सोसायटी” या संस्थेच्या स्थापनेची घोषणा.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी “होमियोपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल सोसायटी” या संस्थेच्या स्थापनेची घोषणा.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टरांचे, कोविड नियमांचे पालन करून, चर्चासत्र-परिसंवादाचे आयोजन १५ऑगस्टच्या दिवशी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. डॉ.प्रविण सावंत यांनी वेगवेगळे कायदे, ऍक्ट, कोर्ट केस व शासकीय बाबींच्या पाठपुराव्या बाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ.शरद काळसेकर यांनी होमियोपॅथिक डॉक्टर्सच्या आजवरच्या लढ्याचा थोडक्यात आढावा घेतला. डॉ.संतोष राणे यांनी होमियोपॅथिक डॉक्टर्स च्या प्रश्न व सोडवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. डॉ.दीपक ठाकूर यांनी संघटना या विषयावर विवेचन केले. डॉ. गिरीश बोर्डवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टर्सच्या पुढाकाराने कायदेशीर लढा, माहिती अधिकाराचा योग्य वापर आणि प्रशासकीय पाठपुरावा, या त्रिसूत्रीवर काम करत होमियोपॅथिक डॉक्टर्स समोरील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करण्यात येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील संघटनां मधील फायद्या तोट्याचे राजकारण, त्यातून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हितसंबंध, आणि सार्व.आरोग्यव्यवस्थे मधील सचिव-संचालक लॉबीचे वैयक्तिक स्वार्थ, यातून होमियोपॅथिक डॉक्टर्सना शासकीय सेवेसह आरोग्य क्षेत्रातील मुख्य प्रवाहा पासून हेतुपुरस्सर ‘वाळीत टाकण्याचा प्रकार’ होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या होमियोपॅथिक डॉक्टरांच्या धोरणात समन्वय नाही त्या मुळे जनतेला सार्व. आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय मनुष्यबळ आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या उपचार पद्धती पासून वंचित ठेवण्यात येत आहे.
देशातील कोणताही पक्ष, लोकप्रतिनिधी हे होमियोपॅथिक डॉक्टर्स च्या विरोधात नाही तरी चुकीच्या नियमात आणि कायद्यात अडकवून देखील खेडोपाडी, शहरांच्या निम्नस्तरीय वस्त्यांमध्ये गेली अनेक वर्षे प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून होमियोपॅथिक डॉक्टरांनी आजवर काम केले आहे.
केंद्र राज्य यांच्या असमानतेच्या धोरणा विरोधात या पुढे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून न्यायालयाचे दार ठोठावण्या शिवाय गत्यंतर नाही अशी अवस्था झाली आहे. ह्या करीता महाराष्ट्र व देशपातळीवर होमियोपॅथिक डॉक्टर्स ना एका व्यासपीठावर आणण्याचे काम ह्या स्वातंत्र्यदिना पासून हाती घेत आहोत. गवर्निंग कौन्सिल हे केंद्र स्थानी तर राज्य पातळीवर आणि जिल्हा/तालुका पातळीवर ‘वर्किंग कमिटी’ अशी त्रिस्तरीय रचना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा येत्या महिन्याभरात करण्यात येईल.
संस्थेच्या नामफलकाचे उदघाटन होमियोपॅथिक संघटनेचे अनुभवी कार्यकर्ते डॉ.अरुण गोडकर यांच्या हस्ते व डॉ.दीपक ठाकूर, डॉ.अभिनंदन मालंडकर, डॉ.जे.के.घाडी, डॉ.सी.आर.परब, डॉ.गार्गी ओरसकर, डॉ.संतोष केळकर, डॉ.रामदास बोरकर, डॉ. हर्षद पटेल यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ.भालचंद्र पिसे, डॉ.मयुरेश खाडिलकर, डॉ.राजू कोचर्गी, डॉ.शंकर राऊळ, डॉ.संजय कोकाटे, डॉ.मिलिंद बोर्डवेकर, डॉ.रोहन कोरगावकर, डॉ.प्रथमेश वालावलकर, डॉ.अमोल हुले, डॉ.रवींद्र बुरुड, डॉ.रोहन तडूळे आदीं जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख होम.डॉ. उपस्थित होते.

अभिप्राय द्या..