जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका.;पालकमंत्री उदय सामंत

जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका.;पालकमंत्री उदय सामंत


सिंधुदुर्गनगरी /-

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसाठी जिल्हा ग्रंथालय येथे अभ्यासिका सुरु करण्याचा निर्णय आज घेतल्याची माहिती, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा ग्रथंलाय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त एतिहासीक ग्रंथ आणि स्वातंत्र्य लढ्यातील थोर व्यक्तींची चरित्र या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री सामंत बोलत होते. ग्रंथालयातील पुस्तके हवामानामुळे तसेच वाळवी लागून खराब होतात. त्यामुळे या पुस्तकांचे डिजीटल पुस्तकांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा असा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

अभिप्राय द्या..