चौके /-

वनसंवर्धन दिनानिमित्त वनविभाग उमरखेड जिल्हा यवतमाळ तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर, हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

सदर स्पर्धेत राज्यभरातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या ५४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून भविष्यातील मानवाच्या वाटचालीसाठी वनसंवर्धन कसे महत्वाचे आहे हे सांगितले आहे त्याचबरोबर वनसंवर्धनाच्या नवनवीन संकल्पना रेखाटल्या. एकापेक्षा एक सरस अशा शेकडो कलाकृतींमधून उत्कृष्ट कलाकृती निवडण्याचे काम धनुष्य संस्थेचे सचिव गजानन वानखेडे मास्टर ऑफ फाईन आर्ट , व सदस्य कमलेश राठोड बॅचलर ऑफ फाईन आर्ट यांनी केले. व्यंगचित्रकार तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रभाकर दिघेवार यांच्या संकल्पना व पुढाकारातून तसेच वन अधिकारी अमोल थोरात यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रेया चांदरकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. श्रेया ही वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांची मुलगी आहे.

श्रेयाच्या या यशाबद्दल वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे मुख्याध्यापक एन. के. कांबळे सर तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
फोटो माहिती =
१) कुमारी. श्रेया समीर चांदरकर
२) राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेसाठी श्रेया चांदरकर हिने रेखाटलेले चित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page