माध्यमिक शिक्षक पतपेढीच

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे नव्या अध्यक्ष पदी संदीप कदम यांची निवड..

ओरोस /-

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षण सहकार पॅनेलच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप लवू कदम यांची बिनविरोधी निवड झाली आहे. पतसंस्थेचे माजी चेअरमन डगरे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर निवड झाली . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वैभववाडी सहाय्यक निबंधक डी के चव्हाण यांनी काम पाहिले. संदीप कदम यांच्या चेअरमनपदी निवड झाल्याने शिक्षक वर्गातुन त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे . चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर शिक्षण सहकार पॅनलचे प्रमुख संजय वेतुरेकर , सी डी चव्हाण , विजय ठाकर, कास्ट्राईब संघटनेचे महासचिव शेषकुमार नाईक, अतिरिक्त महासचिव संदीप नागभिडकर, विद्यामंदिर प्रशाले मुख्याध्यापक भारत सरवदे, अच्युत वनवे व अन्य सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले

अभिप्राय द्या..