दोडामार्ग येथे ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या “फॅशन वर्ल्ड” सुसज्ज दालनाचा शुभारंभ..

दोडामार्ग येथे ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या “फॅशन वर्ल्ड” सुसज्ज दालनाचा शुभारंभ..

दोडामार्ग /-

दोडामार्ग शहरातील भेडशी रोडवरील आशीर्वाद टॉवर इथे शंभर टक्के ओरिजनल ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या फॅशन वर्ल्ड या सुसज्ज दालनाचा सोमवारी तालुक्याचे तहसीलदार अरून खानोलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मालक साईश दळवी, विजय दळवी यांच्यासह सिंधदुर्ग जिल्हा बँक दोडामार्ग शाखेचे शाखाधिकारी श्री.लाखे, दिलीप कणेकर, आनंद तळणकर, अमर राणे, आदी उपस्थित होते. या नव्यानेच सुरू झालेल्या शोरुममध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे शंभर टक्के ओरिजनल ब्रॅन्डेड रेडिमेड गारमेंट ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्यास ग्राहक शहरवासीय व नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल फॅशन शोरूमचे मालक साईश विजय दळवी यांनी आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..