कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कलमठ गुरववाडीतील पुरबाधित आणि फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. जुलै महिन्यातील पुराने कोरोनामुळे आधीच होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला. पुरामुळे झालेल्या अपरिमित हानीने संकटग्रस्तांचे जीवनच उघड्यावर पडले. अनेकांचे संसारातील साहित्य वाहून गेले. अतिवृष्टीमुळे साठवलेला अन्नगोटाही खराब झाला. पूरबाधितांचे अश्रू पुसत त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची उर्मी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मदतीचा हात देण्याची सूचना पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्गात पूरपीडितांना मदत देण्यात येत आहे. बुधवार 4 ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यातील कलमठ गुरव वाडीत जानवली नदीच्या पुराने बाधित झालेल्या कुटुंबियांना तसेच फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी बांधवाना जीवनावश्यक वस्तूंसह ताट, तांब्या, टोप, पेला, ग्लास आदी संसारोपयोगी साहित्य तसेच खाऊवाटपही करण्यात आले. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कुडाळ नगरसेवक सर्फराज नाईक, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. लिंगावत, अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, समीर आचरेकर, सागर वारंग, सतीश जाधव, अजय जाधव, ऍड. जयराज सावंत, देवेंद्र पिळणकर, सुजय शेलार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page