ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात स्तर ४चे निर्बंध जाणून घ्या.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात स्तर ४चे निर्बंध जाणून घ्या.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्‍ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर चाचणी) अधिक असल्याने हा पॉझिटिव्हीटी दर कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रभावी निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे. अ.क्र. सेवा / आस्थापना / उपक्रम स्तर चार नुसार निर्बंध / सूट 1. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. 2. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील. 3. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह व अन्य करमणूकीची ठिकाणे बंद राहतील. 4. रेस्टॉरंट्स / हॉटेल्‍स / होम स्‍टे /खानावळ सोमवार ते शुक्रवार (Weekdays) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 % आसन क्षमतेुनसार Dining • सायंकाळी 04.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व • शनिवार आणि रविवार (Weekend) फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील. 5. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत 6. खाजगी आस्थापना / कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत. दिनांक 04 जून, 2021 च्‍या निर्देशानुसार वगळण्‍यात आलेल्‍या सर्व आस्‍थापना जसे खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था व गैर बॅंकीग वित्‍त संस्‍था इ. कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील. 7. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 50% उपस्थितीसह सुरु राहतील. • कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्‍थापना, मान्‍सुनपूर्व कामांशी संबंधीत यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. 8. खेळ बाहेर मोकळ्या जागेत (Outdoor) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत. 9. चित्रीकरण सुरक्षित आवरणामध्‍ये (Bubble) सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत मुभा. • सायंकाळी 05.00 वाजलेनंतर कुठेही वावरण्‍यास मनाई (No Movement Outside Bubble) 10. सामाजिक, सांस्कृतिक / करमणूकीचे कार्यक्रम सोमवार ते शक्रवार सभागृह/हॉल आसन क्षमतेच्‍या 50 % उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत 11. लग्नसमारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत 12. अंत्ययात्रा / अंतविधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत 13. बैठका / निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा सभागृह / हॉल आसन क्षमतेच्‍या 50% लोकांच्‍या उपस्थितीत. 14. बांधकाम फक्‍त बांधकाम साईटवर निवासी / वास्‍तव्‍यास मुभा • बाहेरुन मजूर आणण्‍याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत. 15. कृषि व कृषि पुरक सेवा संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. 16. ई कॉमर्स वस्तू व सेवा नियमित पूर्ण वेळ – दररोज 17. जमावबंदी / संचारबंदी • जमावबंदी (5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीस एकत्र येण्‍यास मज्‍जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत • संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्‍त अत्‍यावश्‍यक कामांसाठी मुभा) 18. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्‍या 50% पूर्व परवानगीसह (Appointment) ए.सी.च्‍या वापरास मनाई 19. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) पूर्ण आसन क्षमतेने परंतू प्रवाशांना उभ्‍याने प्रवास करण्‍यास मनाई आहे. 20. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील. 21. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील. जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्‍हामार्गे प्रवास करीत असल्‍यास अशा प्रवाशांना ई पास आवश्‍यक राहील. 22. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह. नियमित पूर्ण वेळ. दररोज 23. उत्पादक घटक १. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठराविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणारे घटक नियमित पूर्ण वेळ . दररोज 24. उत्पादन घटक – इतर क्षेत्रातील सर्व.

अभिप्राय द्या..