You are currently viewing के.आर.सी एम्प्लॉईज आणि रेल कामगार सेना युतिचा विजय निश्चित.; उमेश गाळवणकर

के.आर.सी एम्प्लॉईज आणि रेल कामगार सेना युतिचा विजय निश्चित.; उमेश गाळवणकर

कुडाळ /-

कोकण रेल्वेत मान्यताप्राप्त् युनियनसाठी दिनांक 05 ऑगस्ट् या जी सी दिवशी मतदान होत आहे. के.आर.सी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेना हया दोन युनियनची युति असुन नारळाचे झाड हे निवडणूक चिन्ह् आहे. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी भरावयाचे 560.39 कोटी रुपये कोकण रेल्वेने अद्याप न भरल्याने पुढील काळात निवृत्त् होणाऱ्या कामगाराला पेन्श्न न मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण भारतात फक्त कोकण रेल्वेत सक्षम असणारी मेडीकल पॉलीसी व्यवस्थापनाने बंद केली त्यामुळे अनेक कामगारांचे हाल झाले काही कामगार मृत्युमुखी पडले अशा प्रकारे कोकण रेल्वे व्यवस्थापन रेल्वे कामगाराच्या अहिताचे निर्णय घेत असताना एन आर एम यु या मान्यता प्राप्त् युनियन ने विरोध न करता प्रशासनाला साथ दिली त्यामुळे कोकण रेल्वेचा कामगार एन आर यु ला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. तसेच अभियांत्रीकी विभाग आणि वाणिज्य् विभाग सी ॲण्ड् डब्लू विभाग अशा विविध विभागातील कामगाराचे भविष्य् अंधारमय करणा-या व कामगारांच्या अनेक योजना बंद करायला कारणीभुत असणा-या एन.आर.एम.यु ला कामगार हद्दपार करतील व के.आर.सी आणि आर के.एल युतिचा भरगोस मताधिक्क्याने विजय करतील असा आमचा विश्वास आहे.असे के.आर.सी युनियन चे कार्याध्यक्ष श्री.उमेश सु.गाळवणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा