You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

कुडाळ /-

मुंबई विद्यापीठातर्फे मे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेच्या अंतीम वर्षाचे निकाल लागले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालयाच्या(तृतीय वर्ष) वाणिज्य शाखेचा निकाल १००%लागला . .. . नियमित कॉलेज कॉलेज करून मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त करताना बऱ्याच नोकरी धारक तरुणांना अडचणी येत होत्या. ही अडचण बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी लक्षात घेऊन त्यांनी हे महाविद्यालय सुरू केले आहे. असे हे कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव महाविद्यालय असलेल्या बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षे पहिल्या आणि दुसऱ्या बॅचने हा शंभर टक्के निकाल लावत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये या वर्षी अभिजित राजन कांबळी (सी.जी.पी.ए.६.९०) सर्व सेमीस्टर मिळून ६१.०५ टक्के गुण मिळवून प्रथम , स्वप्निल मुकुंद कदम( सी.जी.पी.ए. ६.६७ ) सर्व सेमिस्टर मिळून एकूण गुण ५९.३५% गुण मिळवून द्वितीय,; तर राजाराम साबाजी नाईक (सी जी पी ए ६.५५)सर्व सेमिस्टर मिळून ५८.४८ टक्के गुण मिळवून तृतीय आला. . .. सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून नोकरी सांभाळत ,कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करून या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. त्याबद्दल प्र.प्राचार्य अरुण मर्गज, संस्था चेअरमन उमेश गळवणकर, इतर संस्था चालक, प्राध्यापक-प्रा.तृप्ती नाईक,प्रा.मनाली मुळीक,प्रा.प्राजक्ता जाधव,प्रा.प्राची बर्वे, किरण सावंत व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

अभिप्राय द्या..