शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून अखेर पाळयेतील वाहतूक पूर्ववत..

शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून अखेर पाळयेतील वाहतूक पूर्ववत..दोडामार्ग /-

मुख्य रस्त्यापासून पाळये गावाला जोडणारा मुख्य पूल गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीतील पुराच्या पाण्याने वाहून गेला होता.त्यामुळे गुरुवार रात्रीपासून पाळये गावातील नागरिकांचा संपर्क तुटला होता.गावातून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व जिल्हा परीषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचेसह घटनास्थळास भेट देत पहाणी केली असता दोडामार्ग तिलारी रस्त्यापासून अवघ्या काही अंतरावर सदर पुल असून तो वाहून गेल्याने पाळये गावातील लोकांचा ये जा करण्याचा रस्ता बंद झाल्याची परीस्थिती कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून देत, लवकरात लवकर रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी प्रयत्नशील राहत तातडीने याची उचल घेतल्याने अखेर पावसाचे प्रमाण थोडे कमी होताच दुरुस्तीचे काम हाती घेऊन रस्ता सुरळीत करण्यात आला असून यासाठी आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी,भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,जिल्हा परीषद कार्यकारी अभियंता अनामिका जाधव,राजेंद्र निंबाळकर,सामाजिक कार्यकर्ते मायकेल लोबो,प्रशांत दळवी,विलास समर्थ,शैलेश दळवी,कोनाळ सरपंच पराशर सावंत,मणेरी सरपंच विशांत तळावडेकर,शाखा अभियंता अमित कल्याणकर, पवार,
स्वप्निल निंबाळकर,नितिन दळवी,अनिल माजीक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..