दोडामार्ग मधील खड्डेमय प्रवास पंधरा दिवसात होईल का बंद ?

दोडामार्ग मधील खड्डेमय प्रवास पंधरा दिवसात होईल का बंद ?

दोडामार्ग /-

दोडामार्ग मधील सर्वात मोठी समस्या ठरलेला राज्यमार्ग आज मृत्यूचा सापळा ठरतोय आणि हाच दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठा गंभीर प्रश्न असून ठीक-ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्यांच साम्राज्य मात्र वाढत चाललंय पावसामुळे खड्यांची रुंदी वाढतच चाललेली आहे, आता पावसाळ्यात रस्ता होणे शक्य नाही त्यासाठी उन्हाळ्याची वाट बगावी लागले आता ह्या खड्डेमय रस्त्यातून पावसाळ्यात प्रवास कसा करावा असा प्रश्न दोडामार्ग वासीयांन समोर पडला असता मंगळवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले असता बांदा ते दोडामार्ग विजघर ते दोडामार्ग आणि आयी ते दोडामार्ग ह्या रस्त्या संदर्भात समस्या मांडण्यात आल्या असता तात्काळ उपयोग योजना करून खड्डे का बजवले नाहीत असा जाब आमदार दिपक केसरकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असता येत्या पंधरा दिवसात काँक्रीट घालून रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा याचा जाब विचारला जाईल असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे यामुळे दोडामार्ग वासीयांना उसूक्ता लागली असून येत्या पंधरा दिवसात खड्डे बुजवले जातील काय व दोडामार्ग मधील खड्डेमय प्रवास येत्या पंधरा दिवसात बंद होईल का असा प्रश्न पडला आहे.

अभिप्राय द्या..