You are currently viewing हुतात्मा रेगे स्मारक परिसरात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण..

हुतात्मा रेगे स्मारक परिसरात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण..

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक सेवा उपक्रम सर्वत्र राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारक येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतील वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच प्रमोद भोगावकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, अनिल केळुसकर, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, यशवंत गावकर यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ व जेष्ठ नागरीक उपस्थित होते.हुतात्मा रेगे स्मारक येथे वाचनालय उभारणी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना दिली.

अभिप्राय द्या..